मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : सांखळी रवींद्र भवनतर्फे दीपोत्सव साजरा
सांखळी/प्रतिनिधी
आपल्या आतील मनाला प्रकाशित ठेवून आपली कला व संस्कृती टिकवून ठेवावीच परंतु ती दुसऱयासाठी उपयोगी आली तर दुसऱयाच्या जीवनात उजेड करून जाते. त्यासाठीच रवींद्र भवन ही कला व संस्कृती जतन करणारी वास्तू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सांखळी रवींद्र भवनात यंदाही दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी आमदार पेमेंद्र शेठ, उपाध्यक्ष विठोबा घाडी, जि. पं. सदस्य गोपाळ सुर्लकर, रवींद्र भवन सदस्य, सरपंच, पंच, समाज कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी दुपारी सदर कार्यक्रम सुरू करण्यात आला. रवींद्र भवन परिसरात 5 हजार पणत्या पेटवून हा परिसर उजळून निघाला होता. रवींद्र भवन विद्युत रिषणाईने सजवण्यात आले होते. डिचोली-सत्तरी तालुक्मयातील कलाकारांसाठीच्या रांगोळी, समूह नृत्य आणि छायाचित्र स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. मोठय़ा संख्येने कला प्रेमी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, कलाकाराला वयाची मर्यादा नसते. बाल, युवा, जे÷, वयस्कर सर्वांसाठी हे रवींद्र भवन खुले आहे, असे सांगून स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
दिव्यांच्या उत्सवात सहभगी होऊन प्रकाशमय होता येतं : पेमेंद्र शेट
सांखळी रवींद्र भवन आयोजित दीपोत्सव खूप काही सांगून जाते. दिव्यांचा उत्सव आपले जीवन प्रकाशमय करून जात असतो. अशी संधी जीवनात एकदाच येते तिचा योग्य फायदा करून घ्या. डिचोली तालुका ही कलाकारांची खाण आहे आम्हा सर्वांसाठी रवींद्र भवन कलचे माहेर घर आहे. येथे कोणत्याच कलेला कधीच बंधन नाही. तसेच दीपोत्सवचे आयोजन करुन अनेक कलाकारांना प्रकाशात येण्याची संधी ही रवींद्र भवन सांखळी यांनी उपलब्ध करून दिली आहे, असे मत मयेचे आमदार पेमेंद्र शेट यांनी समारोप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. प्रास्ताविक स्वाती मायनिकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद उगवेकर यांनी केले व आभार मानले.









