केर्न्स/ वृत्तसंस्था
केर्न्स येथील पहिल्या सामन्याच्या सुऊवातीच्या एक तास आधी घोट्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला. रबाडाच्या उजव्या घोट्याला सूज आल्यानंतर सोमवारी त्याचे स्कॅन करण्यात आले, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एका निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर 30 वषीय या खेळाडू तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला.
दुखापतीनंतरही तो ऑस्ट्रेलियातच राहणार असून दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पुनर्वसन करेल, असे निवेदनात म्हटले आहे. कगिसो रबाडाच्या जागी डाव्या हाताचा जलदगती गोलंदाज क्वेना माफाका याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली नव्हती. क्वेना माफाका मागील टी-20 मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.









