बेळगाव ग्रामीण मतदारसंघ महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना मतदारसंघात चांगला पाठिंबा लाभत आहे.
आज बुधवार दि. २६ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा प्रचारदौरा गणेशपूर, ज्योतीनगर, लक्ष्मीनगर, शिवमनगर, समर्थनगर, रक्षक कॉलनी, डिफेन्स कॉलनी, सिंडिकेट कॉलनी या परिसरात झाला. घरोघरी जाऊन उमेदवार आर. एम. चौगुले यांनी मतदारांची भेट घेतली व यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली.










