व्यापारी बांधवांच्यावतीने जाहीर पाठिंबा
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीच्या आतापर्यंतच्या आमदार निवडीत मार्केटयार्डचे योगदान मोठे आहे. यासाठी बेळगाव ग्रामीणचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झंझावाती प्रचारदौरा केला. यावेळी त्यांनी व्यापारी बंधूंची भेट घेतली. व्यापारी बांधवांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तसेच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. fिशवाय ग्रामीण मतदारसंघात शेतकरी बांधवांसाठी जागृती करून समिती उमेदवाराला निवडून आणण्याचा चंग व्यापारीवर्गाने बांधला आहे. यावेळी व्यापारी माणिक होनगेकर यांनी व्यापारी बांधवांच्यावतीने पाठिंबा व्यक्त केला. य् ाा प्रचारफेरीवेळी समितीचे बाळाराम पाटील, एन. बी. खांडेकर, आर. आय. पाटील, मोहन बेळगुंदकर, ए. एल. पाटील, संजय चौगुले, बसवंत मायाण्णाचे, झंगरूचे, राजू जाधव, लक्ष्मण होनगेकर, अशोक बामणे, राजू हंगीरगेकर, किरण जाधव, प्रशांत पाटील, प्रवीण चांदीलकर, यल्लाप्पा चव्हाण, शंकर चव्हाण, बाबू मोहिते, सुधीर पाटील, कल्लाप्पा पाटील, आनंद कावळे, जोतिबा कटांबळे, राजू पाटील, तुषार टुमरी, विश्वास टुमरी, विनायक नाकाडी, संभाजी होनगेकर, विवेक पाटील, जी. बी. पाटील आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









