वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आम्ही सर्वधर्मीय आज हिंदू म्हणून जगत आहोत. मराठी माणूस वीरराणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महनीय व्यक्तींचा आदर करतो. परंतु बेंगळूर येथे शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा राष्ट्रीय पक्षांना शिवाजी महाराजांबद्दलचा आदर कुठे गेला होता. केवळ मतांसाठी महाराजांचा वापर करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाला चारीमुंड्या चीत करून म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुलेंना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठविण्याचे आवाहन युवा आघाडी अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले. रविवारी कंग्राळी बुद्रुक येथे म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी काढण्यात आली. तत्पूर्वी ते मराठी भाषिकांना उद्देशून बोलत होते. यावेळी अॅङ सुधीर चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय पक्ष हे केवळ मतासाठी मराठी भाषिकांचा उपयोग करून घेत आहेत. आपली मातृभाषा संपवू पाहणाऱ्या या राष्ट्रीय पक्षांना भीक घालू नका, आपला मराठी स्वाभीमान जागवा व आर. एम. चौगुलेंना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी शुभम शेळके यांच्या हस्ते गावच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. अॅङ सुधीर चव्हाण यांनी श्रीफळ वाढविले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा घोषणा देऊन परिसर शिवमय केला. प्रचारफेरी लक्ष्मी गल्ली, कलमेश्वर गल्ली, मरगाईनगर, चव्हाट गल्ली, मराठा कॉलनी, संताजी गल्ली, शास्त्रीनगर, बाहेर गल्ली आदी भागातून फिरवण्यात आली. यावेळी प्रत्येक गल्लोगल्ली आर. एम. चौगुलेंना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.प्रचारफेरीमध्ये मल्लाप्पा पाटील, शंकर कोनेरी, वाय. बी. चव्हाण, ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, तमाण्णा पाटील, राजकुमार पाटील, शंकर चव्हाण, गोपाळ पाटील, सागर भेकणे, अनिल कडोलकर, प्रशांत पवार, शंकर पाटील, कृष्णा हुरूडे, भारता पाटील, सविता सुतार, वंदना चव्हाण, कल्पना निलजकर, अश्विनी पाटील, अनिता पाटील, शर्मिला मंगाण्णाचे, रेश्मा पाटील, सुमन पाटील, सोनाली पाटील, आराध्या भेकणे, रेणुका लोहारसह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.









