वार्ताहर /कंग्राळी खुर्द
तालुका म. ए. समितीचे ग्रामीण भागाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचा झंझावाती प्रचार रविवारी कंग्राळी खुर्द येथे करण्यात आला. गावच्या प्रवेशद्वारातील शिवमूर्तीला पुष्पहार घालून समिती नेते आर. आय. पाटील यांनी श्रीफळ वाढविले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. य् ाावेळी जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य रुक्मिणी निलजकर, प्रशांत पाटील, राकेश पाटील, यशोधन कळसकर, भाग्यश्री गौंडवाडकर, माजी अध्यक्ष भाऊ पाटील, बी. डी. मोहनगेकर, माजी उपमहापौर शिवाजी सुंठकर, मदन बामणे, मनोज पावशे, सुरेश कातकर, यल्लाप्पा चव्हाण, जोतिबा पाटील, विक्रम पाटील, मनोहर पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, दिनेश मुतगेकर, प्रभाकर जाधव यांच्यासह ग्रामस्थ, समिती कार्यकर्ते, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कंग्राळी खुर्दचा समितीचा बालेकिल्ला अभेद्य राखत आर. एम. चौगुलेंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. य् ाावेळी प्रचारफेरीत शिवाजी गल्ली, पाटील गल्ली, संभाजी गल्ली, नारायण गल्ली, आंबेडकर गल्ली, पाटीलमळा, महादेव रोड परिसरातून समितीला वाढता पाठिंबा मिळाला.









