जास्तीतजास्त मतदान करून निवडून देण्याचे केले आवाहन
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
ग्रामीण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी शुक्रवारी सायंकाळी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह कंग्राळी खुर्द गावातील संपूर्ण परिसरात प्रचार दौरा करून जास्तीतजास्त मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले. आजच्या प्रचारदौऱ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
गावच्या शिवाजी चौकातील शिवमूर्तीला समितीचे नेते आर. आय. पाटील आणि विष्णू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली.
प्रचार फेरीमध्ये समितीचे शुभम शेळके, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य प्रशांत पाटील, वैजनाथ बेळगावकर, धनंजय तुळसकर, भाग्यश्री गौंडवाडकर, रेखा पावशे, सुनिता जाधव, माजी अध्यक्षा भाऊ पाटील, रुक्मिणी निलजकर, सचिन शिवनगौडा, श्रीकांत बाळेकुंद्री, दीपक पाटील, व्यंकट मोरे, बाल बसरीकट्टी, किसन पाटील, महेश पाटील, विष्णू पाटील बी. डी. मोहनगेकर, पंडित पाटील, दिनेश मुतगेकर, केदारी पाटील, बाबू पावशे, महेश शहापूरकर, प्रशांत निलजकर, विनायक पाटील, मदन पाटील, अमित बाळेकुंद्री, रणजित पाटील, रवि पाटील, मदन पाटील, ओमकार बाळेकुंद्री, नारायण पाटील, मनोहर पाटील, प्रेमा जाधव, रुक्मिणी पाटील, माया जाधव, परशराम बाळेकुंद्री, सुनिता बाळेकुंद्री, शांताबाई यळ्ळूरकर यांच्यासह कंग्राळी खुर्द परिसरातील युवक मंडळे, महिला मंडळे उपस्थित होती.
प्रचार फेरीतील युवकांनी कंग्राळी खुर्द हा समितीचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करून जास्तीतजास्त मतदान करण्यासंदर्भात जागृती करण्यात येत होती.









