वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांची प्रकृती पूर्ण बरी होत नाही तोवर देशाचे माजी विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी हे इस्लामाबाद पर्यंतच्या ‘हकीकी आझादी मार्च’चे नेतृत्व करणार आहेत. मंगळवारपासून पीटीआयच्या मोर्चाला पुन्हा सुरूवात होणार आहे. इम्रान खान यांच्यावर यापूर्वी मोर्चादरम्यान गोळीबार झाला होता. जखमी इम्रान खान यांना एका यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. इम्रान हे आता लाहोर येथील स्वतःच्या निवासस्थानात विश्रांती घेत आहेत. इम्रान हे या मोर्चामध्ये रावळपिंडी येथे सामील होणार आहेत. इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांचा हात असल्याचा आरोप कुरैशी यांनी केला आहे.









