डायट करणाऱ्या लोकांना ओट्सचा रोज तोच नाश्ता करण्याचा कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत.जर तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट करण्याचा विचार करत असाल तर नाश्त्यासाठी ओट्स डोसा तयार करा. हा झटपट देखील बनतो शिवाय चविष्ट देखील लागतो. चला तर मग जाणून घेऊया ओट्स डोसा कसा बनवायचा.
साहित्य
एक कप ओट्स
पाव कप तांदळाचे पीठ
पाव कप रवा
पाव कप दही
अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
एक कांदा
कढीपत्ता
कोथिंबीर
आले
हिरव्या मिरच्या
पाणी
कृती
ओट्स डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सर मध्ये ओट्सची बारीक पावडर करा. ती एका मोठ्या भांड्यात काढा आणि त्यात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र घाला. तसेच चवीनुसार मीठ आणि जिरे घाला. बारीक चिरलेला कांदा, आल्याचा तुकडा मिक्स करा. सोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घाला. शेवटी दही घालून मिक्स करा. आता या बॅटरमध्ये पाणी घाला. ओट्स डोसामध्ये पाण्याचे प्रमाण तांदळाच्या डोस्यापेक्षा जास्त असावे. याचे बॅटर एकदम पातळ असले पाहिजे. आता हे बॅटर सेट होण्यासाठी अर्धा तास सोडा.आता तवा किंवा पॅन गरम करून त्यावर ओट्स डोसा पसरवा. काही वेळाने उलटा करून प्लेटमध्ये काढा. ओट्स डोसा पीठ पातळ असते, म्हणून ते तव्यावर पसरवण्याची गरज नाही. कोणत्याही चमचाच्या मदतीने तव्यावर टाका आणि सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंगावर शिजवा. नारळ किंवा शेंगदाणा चटणीसह गरम सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









