रेस्टोरंट मध्ये मिळणारा गार्लिक ब्रेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो. पण हाच ब्रेड जर घरी बनवता आला तर आणखीन मजा येईल.आज आम्ही चीज गार्लिक ब्रेड बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. हे बनवायला खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया गार्लिक ब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
ब्रेड, तेल, लसूणच्या ५-६ पाकळ्या, चवीनुसार मीठ, बटर, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, चीज क्यूब्स, कोथिंबीर, मोझारेला चीज.
कृती
सर्वप्रथम लसूण पूर्णपणे सोलून धुवून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात लसूण टाका आणि मग त्यात मीठ घाला. नंतर ते तपकिरी होईपर्यंत चांगले भाजून घ्या.आता भाजलेला लसूण मिक्सरच्या भांड्यात घ्या त्यामध्ये बटर, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, चीज क्यूब्स आणि कोथिंबीर घाला.आणि चांगले थीक पेस्ट बनवा.आता ब्रेड स्लाईस घ्या आणि मग त्यावर ही पेस्ट पसरवा. यानंतर ब्रेड स्लाइसवर मोझारेला चीज पसरवा.आता पॅन किंवा तव्यावर बटर लावून ब्रेड तव्यावर ठेवून झाकून ठेवा. यावेळी गॅस मध्यम आचेवर ठेवा. २ ते ३ मिनिटे झाकण काढा. अशापद्धतीने ब्रेड दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.तयार झालेला गरमगरम गार्लिक ब्रेडचा चहासोबत तुम्ही आस्वाद घेऊ शकता .
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









