सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. शिवाय हा कमी साहित्यात आणि झटपट बनतो.संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही तुम्ही रवा ढोकळ्याचा आस्वाद घेऊ शकता.चला तर मग आज जाणून घेऊयात हा ढोकळा कसा बनतो.
साहित्य :
रवा १ कप
लिंबाचा रस – १ चमचा
साखर – १/२ चमचा
मीठ
इनो – १ चमचा
फोडणीसाठी:
तेल – १ चमचा
मोहरी – १/२ चमचा
हिरवी मिरची – ३-४
कढीपत्ता
हिंग – १/४चमचा
कोथिंबीर
कृती :
सर्वप्रथम एका भांड्यामधे १ कप रवा घ्या. त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि पाऊण कप पाणी घालून रवा भिजवून घ्या. आणि २० मिनिटे झाकून ठेवा. तोपर्यंत कुकरच्या डब्याला तेल लावा म्हणजे ढोकळा झाल्यावर डब्याला चिकटून राहणार नाही. रवा भिजल्यानांतर तो पुन्हा एकदा हलवून घ्या. जर मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये २ ते ३ चमचे पाणी घालून हलवून घ्या. यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घाला. आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. यांनतर एका कढईमध्ये स्टॅन्ड ठेवून २ ग्लास पाणी उकळायला ठेवा. आता रव्याच्या मिश्रणात एक चमचा इनो घालून त्यावर एक चमचा पाणी घाला यामुळे इनो ॲक्टिवेट होईल. यानंतर सर्व मिश्रण एकाच बाजूने हलवून घ्या. आणि लगेचच कढईमधे ठेवून त्यावर झाकण लावा. आणि १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या. ढोकळा थंड झाल्यावर चौकोनी कापून त्यावर तेल व मोहरी/ जिरा, मिरची, हिंग आणि कढीपत्ता यांची फोडणी करून घाला.बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालून टोमॅटो सॉस सोबत ढोकळा सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









