साहित्य
हिरव्या मिरच्या – ३ ते ४
लसूण – ७ ते ८
जिरे – १ चमचा
कढीपत्ता – १० ते १२
ज्वारी पीठ – 2 वाट्या
गहू पीठ – अर्धी वाटी
बेसन – पाव वाटी
कोथिंबीर- १ वाटी
बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी
पांढरे तीळ – 2 चमचा
लाल तिखट – 1 चमचा
जिरे पावडर – 2 चमचे
मीठ
कृती
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात लसूण,मिरची,जिरे आणि कडिपत्याच्या पानाची पेस्ट करून घ्या. आता एका परातीमध्ये २ वाट्या ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी बेसन एकत्र करून घ्या. यानंतर त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ,पांढरे तीळ,जिरे पावडर ,चवीपुरते मीठ लाल तिखट आणि लसूण मिरचीची पेस्ट हे सर्व पदार्थ घालून सर्व पीठ एकजीव करून घ्या. आणि त्यामध्ये थोडं – थोडं पाणी घालून मळून घ्या. यांनतर पीठ १५ मिनिटे बाजूला ठेवा. यांनतर एका पळपोटावर कॉटनचे कापड ठेवून त्यावर थालपीठ थापून घ्या. आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. गरमागरम आणि चविष्ट थालीपीठ दही,किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









