सणासुदीच्या दिवसात गोडधोड करण्याची पद्धत असते.मिठाईचे वेगवेगळे प्रकारही घरी बनवले जातात. पण आज आपण एक झटपट आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी कशी करायची हे जाणून घेणार आहोत.ही रेसिपी अगदी कमी साहित्यात देखील तयार होते. तसेच अगदी सोपी देखील आहे.
साहित्य
१ नारळ
साखर
अर्धा कप दूध
एक चमचा तूप
वेलदोडे पूड
ड्रायफ्रुटस
कृती
प्रथम नारळ खवणून घ्यावा. त्यानंतर एका कढईमधे १ चमचा तूप घाला. त्यामध्ये किसलेला नारळ घालावा. जेवढी वाटी खोबऱ्याचा किस असेल त्याच्या पाऊण वाटी साखर त्यामध्ये घालावी.तसेच त्यामध्ये वेलची पूड आणि अर्धा कप दूध (दुधाची साय वापरली तरी चालेल)घालून त्याचा गोळा होईपर्यंत सर्व मिश्रण हलवत राहायचं आहे.यावेळी गॅस मंद आचेवर असायला हवा. मिश्रणाचा गोळा झाल्यानंतर एका प्लेट ला तूप लावून घ्यावे. आणि त्यामध्ये मिश्रण घालून एकसारखं प्लेन करून घ्यावे.मिश्रण गरम असतानाच त्याच्या चाकूने वड्या करून घ्याव्यात.तुम्हाला जर हवे असतील तर ड्रायफ्रुटसही यावर तुम्ही लावू शकता.तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









