दोन मिनिटात होणारी मॅगी तर सर्वानाच आवडते.मग काही जण मॅगीमध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालून रेसिपीची लज्जत वाढवतात. पण जर तुम्हाला मॅगीपासून काहीतरी चटपटीत खायचं असेल तर मॅगी भेळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता.ही खूप सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत नाश्ता हवा असेल तर मॅगी भेळ उत्तम पर्याय आहे चला तर मग जाणून घेऊया कशी बनते ही मॅगी भेळ.
साहित्य :
मॅगी – १ पाकीट
तेल
बारीक चिरलेला कांदा – १
बारीक चिरलेला टोमॅटो – १
हिरवी मिरची
कोथिंबीर
भाजलेले शेंगदाणे – २ चमचे
चाट मसाला – अर्धा चमचा
लिंबू
मीठ
कृती :
सर्वप्रथम मॅगी भेळ बनवण्यासाठी एक किंवा दोन पॅकेट मॅगी शेवेप्रमाणे बारीक करुन घ्या. यानंतर कढईत तेल गरम करून मॅगी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवा.आता एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालून त्यात लिंबाचा रस, चाट मसाला हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्या. यानंतर त्यामध्ये तळून घेतलेली मॅगी घाला.आणि सर्व मिश्रण नीट मिक्स करुन घ्या.आता त्यात थोआवश्यक असल्यास त्यात चवीनुसार मीठ घाला. यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. तयार झालेली स्वादिष्ट भेळ सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









