सणासुदीच्या दिवशी गोडधोड करण्याची परंपरा असते.लाडू,करंजी,शंकरपाळी यांसारखे पारंपरिक मिठाईचे पदार्थ घरी नेहमी बनत असतात. पण यासोबतच आज आपण झटपट होणारी खोबऱ्याची बर्फी कशी बनवतात ते जाणून घेणार आहोत.
साहित्य
खवलेलं खोबरं – पाव किलो
दूध – १ कप
पिठी साखर – १०० ग्रॅम
हिरवी वेलची पावडर – १/४ टीस्पून
दूध पावडर – १०० ग्रॅम
पिस्त्याचे तुकडे
कृती
सर्व प्रथम खोबर मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करून घ्या. नंतर एका कढईत हे मिश्रण घ्या आणि त्यात पिठीसाखर आणि दूध एकत्र मिसळा.यानंतर, हे मिश्रण मध्यम आचेवर ठेवून, हे मिश्रण घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.नंतर त्यात दूध पावडर आणि वेलची पावडर मिसळा. हे मिश्रण सुमारे तीन मिनिटे शिजवा. पण लक्षात ठेवा की ते सतत चमच्याने ढवळत राहावे जेणेकरून मिश्रण तव्याला चिकटणार नाही.यानंतर एका प्लेटवर बटर पेपर पसरवून त्यावर हे मिश्रण फिरवा. र हे मिश्रण चमच्याने दाबून एकसारखे करा म्हणजे ते गुळगुळीत होईल.वरून त्यावर पिस्त्याचे तुकडे टाका आणि पुन्हा थोडा दाबा म्हणजे त्यात पिस्ते चांगले चिकटतील.थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा आणि नंतर त्याचे लहान तुकडे करा.तुमची स्वादिष्ट नारळ बर्फी तयार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









