मूग डाळीमधून शरीराला प्रोटीन आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच पचायला हलकी असल्याने मुगडाळ उन्हाळ्याच्या दिवसात आहारात ठेवणे फायदेशीर ठरते. आज आपण मूगडाळीपासून स्वादिष्ट वडे कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.
साहित्य
1वाटी भिजवलेली मूग डाळ
1/2 चमचा धने पावडर
1/2 चमचा जिरे
1 चमचा चिली फ्लेक्स
1/2 चमचा जिरे पावडर
1/2 चमचा गरम मसाला
1/2 चमचा चाट मसाला
10/11 लसूण पाकळ्या
3 हिरव्या मिरच्या
मीठ
1 बारीक चिरलेला कांदा
तेल
कृती
सर्वप्रथम मिरची आणि जिरे मिक्सरच्या भांडयात वाटून घ्या. नंतर त्याच भांड्यात ४ तास भिजवलेली मुगडाळ जाडसर वाटून घ्यावी.आता एका बाऊलमध्ये जाडसर वाटलेली मुगडाळ काढून घ्या. यानंतर त्यामध्ये धने जिरे पावडर, गरम मसाला, चाट मसाला,चिली फ्लेक्स,चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा,बारीक वाटलेली लसूण हे सर्व जिन्नस त्यामध्ये घालून एकजीव करून घ्या. जर मिश्रण जास्त पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तांदळाचे पीठ किंवा बेसन पीठ घालावे.यांनतर तयार मिश्रणाचे गोल वडे करून घ्या. यानंतर गॅस वर तेल तापत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर सर्व वडे तळून घ्या. तयार झालेले गरमागरम वडे सॉस सोबत सर्व करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









