वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर क्वालकॉमची भारतात सेमीकंडक्टर चिप्स तयार करण्याची योजना आहे. ते त्यांच्या कौशल्याचा वापर करणार असून स्थानिक भागीदारांसह मोठ्या प्रमाणावर प्रगत चिप्स तयार करणार आहेत. भारतासाठी क्वालकॉमच्या योजनेत आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर गुंतवणुकीचा विचार केला जाणार आहे. सध्या, ते चिप्स डिझाइन करतात आणि ते जागतिक स्तरावर भागीदार तयार करतात. या भागीदारपैकी एक तैवानचे टीएसएमसी आहेत. उत्पादन केल्यानंतर, ते या चिप्स, मोबाइल डिव्हाइस निर्माते आणि कार उत्पादकांना विकतात. ‘एकदा भारतात सुविधा मिळाल्यानंतर, क्वालकॉम स्थानिक पातळीवर गुंतवणूक आणि उत्पादन प्रक्रियेत योगदान देईल,’ असे क्वालकॉम इंडियाचे अध्यक्ष सवी सोईन यांनी एका मुलाखतीत सांगितले.
सरकारी मदतीची गरज
‘आमच्या उत्पादनांना अधिक मागणी निर्माण करण्यासाठी आम्हाला भारतातील सरकारकडून मदतीची गरज आहे,’ सॉईन म्हणतात. म्हणून, आम्हाला अधिक स्थानिक ब्रँडची आवश्यकता आहे जे आमच्या चिप्स वापरतील. चीनमध्ये ही समस्या नव्हती, त्यांच्याकडे बरेच ग्राहक ब्रँड होते.
चिप डिझाइनमध्ये एल अँड टी उतरणार
लार्सन आणि टुब्रो ही कंपनीदेखील आता चिपच्या क्षेत्रात उतरणार आहे. सदरची कंपनी या क्षेत्रात विकासासाठी 830 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सदरची कंपनी याअंतर्गत सेमीकंडक्टर चिप डिझाइन करणार आहे, असे सांगितले जात आहे. या स्पर्धात्मक युगात चिपची गरज अधिकाधिक कंपन्यांना लागत असून या व्यवसायात कंपनीला आपले योगदान द्यायचे आहे. चीन, तैवान आणि कोरियन फर्मना टक्कर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सीएफओ आर शंकर रामन यांनी म्हटले आहे. ऑटोमोबाईल आणि औद्योगिक क्षेत्राकरीता लागणाऱ्या चिप्सचे डिझाइन कंपनी आगामी काळात करणार आहे, असेही ते म्हणाले. याकरीताच कंपनी 830 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतातच चिप डिझाइनसाठी तुलनेत कमी खर्च येणार असून भारतातील सेमीकंडक्टर चीपच्या मागणीची पूर्तता करण्याकडेच कंपनीचे प्रयत्न असणार आहेत.









