वृत्तसंस्था/ दोहा
23 वर्षाखालील वयोगटाच्या येथे खेळविण्यात आलेल्या एएफसी आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेतील रविवारच्या च गटातील सामन्यात यजमान कतारने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
या सामन्यात 18 व्या मिनिटाला अल हशमी मोहालदीनने कतारचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत कतारने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 52 व्या मिनिटाला मोहम्मद सुहेलने भारताचे खाते उघडले. 67 व्या मिनिटाला पेनल्टीचा अवलंब झाल्यानंतर जेसिम अल शेरशेनीने कतारचा दुसरा आणि निर्णायक गोल केला. या सामन्यात कतार संघाला शेवटच्या काही मिनिटांमध्ये 10 खेळाडूनिशी खेळावे लागले.









