वृत्तसंस्था /कतार
आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत यजमान आणि विद्यमान विजेत्या कतारने उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणचा निसटता पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता या स्पर्धेत कतार आणि जॉर्डन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत कतारतर्फे तिसरा आणि निर्णायक गोल अल्मोझ अलीने केला. या स्पर्धेत कतारने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत कतारला इटलीकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. कतारला या मागील पराभवाची आजही चांगलीच आठवण आहे. उपांत्य सामन्यात चौथ्याच मिनिटाला इराणचे खाते सरदोर अझमॉनने उघडले. त्यानंतर पाच मिनिटांच्या कालावधीत जेसीमने गाबेरने कतारला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला केवळ दोन मिनिटे बाकी असताना अक्रम अफीफने इराणचा दुसरा गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात अलीरझा जेहानबक्षने कतारचा दुसरा गोल करून पुन्हा बरोबरी साधली. सामना संपण्यास केवळ दोन मिनिटे बाकी असताना कतारचा तिसरा आणि निर्णायक गोल अलमोझ अलीने केल्याने इराणचे आव्हान संपुष्टात आले. कतारला या सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागले.









