1 टक्क्यांच्या हिस्सेदारीसाठी 1 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या विचारात
नवी दिल्ली :
कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (क्यूआयए) लवकरच रिलायन्स रिटेल उपक्रमातील भागभांडवल विकत घेण्याच्या विचारात आहे. फायनान्शिअल टाईम्सने बुधवारी वृत्त दिले की क्यूआयए एक टक्का हिस्सा खरेदी करण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवण्याचा विचार करत आहे.
कंपनीने भागभांडवल विकत घेतल्यास मुकेश अंबानींच्या रिटेल युनिटचे मूल्य 100 अब्ज डॉलर होणार असल्याचे संकेत आहेत. ही बाब अशावेळी घडत आहे जेव्हा अनेक गल्फ वेल्थ फंड भारताच्या किरकोळ बाजारात भाग घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
2020 मध्ये, सौदी अरेबियाच्या गुंतवणूक निधीने रिलायन्स रिटेलमध्ये 462.4 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनात 2.04 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी 1.3 अब्ज गुंतवले. न्यूयॉर्क कंपनी ‘केकेआर’ आणि दोन अबू धाबी सार्वभौम गुंतवणूक फंड
यांचाही रिटेल कंपनीत हिस्सा आहे.
क्यूआयएने गेल्या वर्षी जेम्स मरडॉकच्या नवीन माध्यम आणि शिक्षण उपक्रम बोधी ट्रीमध्ये 1.5 बिलियन पर्यंत गुंतवणूक करण्याचे वचन दिले होते. रिबेल फूड्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीमध्येही गुंतवणूक केली आहे. रिलायन्स आता आपल्या रिटेल व्यवसायात विविधता आणण्याचे ध्येय ठेवत आहे.
अंबानी म्हणाले, ‘किरकोळ व्यवसायाने जलद स्टोअर विस्तार आणि ग्राहकांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ यामुळे मजबूत वाढ नोंदवली आहे.
रिलायन्स रिटेलने तिमाहीत 555 स्टोअर उघडले आणि सर्व स्वरूपांमध्ये 24.9 कोटींसह आतापर्यंतची सर्वाधिक संख्या पाहिली. त्याचे डिजिटल कॉमर्स आणि नवीन कॉमर्स व्यवसाय वाढतच राहिले आणि पहिल्या तिमाहीत महसुलात 18 टक्के योगदान दिले. रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश आणि कॅरीचे अधिग्रहण देखील पूर्ण केले.









