वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणजेच आयपीओ आज अर्थात 18 ऑगस्ट रोजी बाजारामध्ये सबक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी 55 लाख ताजे समभाग सादर करणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी 37 लाख समभाग सादर करणार आहे.
किती उभारणार रक्कम
या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 139 ते 153 कोटी रुपये उभारणार आहे. 151-166 रुपये इतकी समभागाची किंमत निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 90 समभागांच्या एका लॉटसाठी बोली लावता येणार आहे. या अंतर्गत एक लॉट सबक्राईब करायचा झाल्यास कमीत कमी 14,940 रुपये गुंतवणे गरजेचे असणार आहे. आयपीओ 22 ऑगस्टपर्यंत सबक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. या आयपीओचे लिस्टिंग 30 ऑगस्टला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणासाठी किती प्रमाण राखीव
पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांसाठी आयपीओमध्ये 30 टक्के राखीव प्रमाण असेल तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हे प्रमाण 20 टक्के असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के प्रमाण राखीव ठेवण्यात आले आहे.









