मुंबई
पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनी पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड यांचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात लिस्ट झाला. सदरचा कंपनीचा समभाग 166 रुपये इशु किमतीच्या तुलनेत 13 टक्के प्रिमीयमवर लिस्ट झाला. बीएसईवर समभागाची सुरुवात सकाळी 185 या भावावर झाली. तर एनएसईवर हा समभाग 187 भावावर खुला झाला. याठिकाणी 12 टक्के प्रिमीयमसह समभाग खुला झाला. मागच्या आठवड्यात दाखल झालेला कंपनीचा आयपीओ जवळपास 18 पट सबस्क्राइब झाला होता.









