वृत्तसंस्था / उदयपूर
भारताची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू तसेच दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा विवाह येथे उद्योगपती व्यंकटदत्त साई यांच्याशी साजरा झाला. या विवाह समारंभाला दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
पी. व्ही.सिंधू आता बॅडमिंटन क्षेत्रातील प्रवासानंतर आपल्या वैवाहिक जीवनाच्या प्रवासाला प्रारंभ करीत आहे. केंद्रिय पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी उपस्थिती दर्शविली. वधू-वरांना अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.









