अन्यथा टोल देणार नसल्याचा म. ए. युवा सा†मतीचा इशारा
बेळगाव : बेळगाव ते गोवा या नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 चे काम पूर्णत्वास आले आहे. आता ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. पण, सदर फलक केवळ कानडी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आले आहेत. त्यामध्ये मराठीला स्थान देण्यात आलेले नाही. महामार्गावर मराठीत फलक न लावल्यास टोल भरणार नाही असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आला. महाराष्ट्र मराठी युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या रस्त्यासाठी मराठी शेतकऱयांनीच आपल्या शेत जमिनी दिल्या आहेत. बेळगाव आणि खानापूर तालुक्यात मराठी भाषिक बहुसंख्य आहेत हे केंद्रीय रस्ते प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला ठाऊक असून देखील मराठीला जाणीवपूर्वक वगळले गेले आहे.
भाषाया अभावामुळे गैरसोय
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्याला जोडणारा महामार्ग असल्याने परराज्यातून हजारो प्रवाशी आणि मालवाहतूक वाहनांची ये-जा रोज होत असते. पण, महाराष्ट्र आणि गोवा मधून येणाऱया चालकांना इंग्रजी-कानडी भाषेचे ज्ञान नसल्याने स्थानिक लोकांना विचारून पुढे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. मागणी पूर्तता करण्यो आश्वासन व्यवस्थापक श्री. एस. एम. नाईक यांनी निवदेन स्वीकारून, बेळगाव-पणजी महामार्गावर मराठी भाषेत फलक लावण्यासाठी बेंगळूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालय आणि विभागीय कार्यालय धारवाड यांच्याशी पाठपुरावा करून मागणीची पूर्तता केली जाईल असे आश्वासन म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा नेते शुभम शेळके, सुरज कुडुचकर, सचिन केळवेकर, किरण मोदगेकर, वासू सामजी, आनंद पाटील, विनायक कावळे, प्रवीण रेडेकर आणि मनोहर संताजी आदी उपस्थित होते.