अनगोळ येथील युवक मंडळाचे महापौरांना निवेदन
बेळगाव : अनगोळ येथील श्री धर्मवीर संभाजी चौक येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी हिंदुधर्मियांना उत्सव साजरा करण्याव्यक्तीरिक्त इतर कोणत्याही समाजाला या चौकामध्ये उत्सव साजरा करण्यास मुभा देवू नये, असा ठराव महापालिकेमध्ये करावा, अशी मागणी महापौर शोभा सोमणाचे यांच्याकडे युवक मंडळाने केली आहे. अनगोळ येथील धर्मवीर चौक येथे ग्रामस्थ तसेच युवक मंडळे आणि शिवभक्तांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी हिंदू उत्सव साजरा करण्यास मुभा देणे गरजेचे आहे. जर इतरांना उत्सव साजरा करण्यास मुभा दिली तर अप्रिय घटना घडू शकते. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून हिंदू वगळता इतर कोणत्याही समाजाला या परिसरात उत्सव करण्यास परवानगी देवू नये, असे या निवेदनात म्हटले आहे.









