Put name boards in front of idols for the development of spiritual tourism!
माजी आमदार शिवराम दळवींची मागणी
कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो . या जिल्ह्यातील अध्यात्मिक पर्यटन स्थळे देश- विदेशातील पर्यटकांना भुरळ घालत आहेत. गावा – गावातील अध्यात्मिक पर्यटन स्थळे मंदिरे पंचायतन देवस्थान मंदिरांचा विकास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गावागावातील पंचायतन देवस्थान मंदिरातील देवतांच्या मुर्त्या यांच्या समोर त्या देवतांची नावे पाट्या लावण्यात याव्यात जेणेकरून पर्यटकांना व अध्यात्मिक अभ्यासाकडे सदरच्या मंदिरातील असलेल्या मुर्त्या कोणत्या देवाच्या आहेत याची ओळख ही होईल. त्यामुळे , मंदिर देवस्थान कमिटीने याकडे लक्ष द्यावे . आणि गावातील पंचायत देवस्थान मंदिरातील मुर्त्यांसमोर नावाच्या पाट्या लावण्यात याव्यात अशी मागणी माजी आमदार शिवराम दळवी यांनी केली आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









