राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज हाती आले. या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामिण भागातील अनेक चुरस गोष्टी ऐकायला आणि पहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायतीची विशेष चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आजोती गाव चर्चेत असून एका निष्ठावान कार्यकर्त्याने केलेला पण पुर्णत्वास नेला. गावात ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसचा सरपंच झाल्याने त्याने तीन वर्षापासून न कापलेली केस आणि दाढी आता कापणार आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. थेट सरपंचपदामुळे निवडणूकीत मोठी रंगत पहायला मिळाली आहे. आजोती गावातील अमरजीत पवार यांनी जो पर्यन्त गावात राष्ट्रवादीचा सरपंच होत नाही तोपर्यंत दाढी आणि कटींग करणार नाही अशी शपथ घेऊन पण केला होता. तीन वर्षानंतर आता अमरजीत पवार यांची शपथ पुर्ण होणार आहे. त्यांच्याच भावाची बायको आरती पवार राष्ट्रवादी पक्षाकडून सरपंचपदासाठी निवडणुकीत उभ्या राहील्या होत्या. निकालानंतर त्या बहुमताने निवडून आल्या. निकाल हाती येताच अमरजीत पवार यांनी ‘पुष्पा’ स्टाईलने दाढीवरून हात फिरवून विजयी जल्लोष केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








