नेपाळच्या (Nepal) राजेशाहीविरुद्ध दशकभर चाललेल्या बंडाचे नेतृत्व करणारे माओवादी नेते पुष्पकमल दहल (Pushpakamal Dhal ) ज्यांना प्रचंड (Prachand) म्हणून ओळकले जाते यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने मुख्य विरोधी पक्षांसोबत युती करून त्यांना पंतप्रधानपदावर दावा केला.
राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी रविवारी CPN-Maoist Center चे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांचे नाव नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून जाहीर केले. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, घटनेच्या कलम ७६ कलम २ नुसार प्रचंड यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधानपदासाठी दावा सादर करण्यासाठी नेपाळच्या संविधानाच्या कलम ७६ कलम २ नुसार दोन किंवा अधिक पक्षांच्या पाठिंब्याने बहुमत मिळवू शकणाऱ्या प्रतिनिधी सभागृहाच्या कोणत्याही सदस्याला राष्ट्रपती बोलावणे गरजेचे आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रपतींनी दिलेली मुदत संपण्यापूर्वी ६८ वर्षीय प्रचंड यांनी पंतप्रधानपदासाठी आपला दावा सादर केला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









