मुंबई
‘पुष्पा -२’ ने पहिल्यादिवशीच २९४ कोटींचा बिझनेस केला तर या सिनेमाने दुसऱ्याच दिवशी ५०० कोटी क्रॉस केले. याच सिनेमाने एका आठवड्यात १००० कोटींची चौकट ओलांडली आहे. जगभरात या सिनेमाने फक्त सहा दिवसात एवढा बिझनेस केला आहे. ‘पुष्पा २’ चे हे यश रेकॉर्ड ब्रेकीग आहे.
सुकुमार यांचे दिग्दर्शन असलेला ‘पुष्पा २’ यामध्ये अलु अर्जूनची मुख्य भूमिका आहे. इंडियाज् क्रश असलेली रश्मिका मंधाना ही या सिनेमात आहे. अलीकडेच कोव्हीडनंतर प्रेक्षकांची ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त पसंती देत आहेत. प्रेक्षक सिनेमागृहाकडे पुर्वी सारखे येत नाहीत. पण ‘पुष्पा २’ प्रदर्शित झाल्यावर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मल्टिप्लेक्स सोबतच छोट्या शहरांमधील सिंगल स्क्रिन थिएटरना सुद्ध हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत.
Previous Articleन्याययंत्रणेतील व्यक्तीसह चौघांवर लाच मागितल्याचा गुन्हा
Next Article मान्याचीवाडीचा दिल्लीत सन्मान









