वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय वंशाचा क्रिकेटपटू पुष्कर शर्मा आता आफ्रिकन क्रिकेट क्षेत्रात प्रवेश करीत असून तो केनियाच्या राष्ट्रीय संघातून खेळणार आहे. चालू वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात त्याची केनियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. भारतात जन्मलेल्या पुष्कर शर्माने रेवाँडा येथे झालेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक उपविभागीय आफ्रिका अ संघातून आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. गेल्या वर्षी पुष्करने नैरोबी क्रिकेट संघटनेच्या सुपर डिव्हिजन लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना 14 डावात 841 धावा जमविल्या आहेत. आफ्रिकन क्रिकेट प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत पुष्कर शर्माने 228 धावा जमविल्या असून त्याने गोलंदाजीत 5 बळी मिळविले आहेत.









