मुंबई- शिवसेनेत (shivsena) दुफळी माजत असताना काँग्रेसच्या गडाला देखील हादरे बसायला सुरवात झाली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. या पराभवाची जबाबदारी मी घेतो असं सूचक विधान बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी केलं होतं. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी आता काँग्रेसच्या (congress) गटनेतेपदावरुन पायउतार होण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी काल पराभव मान्य करत आमच्याच पक्षाची मतं फुटली तर इतरांना काय दोष देणार असं विधान केलं होतं. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे.
Previous Articleविद्यार्थ्यांच्या जीवाची फरफट थांबणार कधी?
Next Article बायोगॅस प्रकल्प उभारणीचे काम लागणार मार्गी








