गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून होणार विराजमान
पणजी : गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून पुसापती अशोक गजपती राजू यांना शनिवारी 26 जुलै रोजी शपथ देण्यात येणार असून, त्यांच्या शपथविधीची जय्यत तयारी दोनापावला येथील राजभवनात सुरू आहे. गजपती राजू हे आंध्र प्रदेशातील राजघराणातील व्यक्तिमत्व असून, त्यांनी राजकारणात बरीच वर्षे विविध खात्यांची मंत्रीपदे भूषवली आहेत. भाजपच्या केंद्र सरकारमध्ये ते नागरी उड्डाण मंत्री म्हणूनही विशेष छाप पाडली आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पुसापती अशोक गजपती राजू यांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, विविध खात्यातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. सध्या कार्यरत असलेले राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे 2021 पासून गोव्यात राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांनी गोव्यातील 4 वर्षांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.









