बेंगळूर
बांधकाम क्षेत्रातील कंपनी पूर्वांकाराने आपला 30 जून अखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीने या कालावधीत 17 कोटी रुपयांचा तोटा प्राप्त केला आहे. 30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत घर विक्रीच्या माध्यमातून 1126 कोटी रुपये कंपनीने प्राप्त केले आहेत. कंपनीच्या महसुलामध्ये पाहता वर्षाच्या पातळीवर 50 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. जूनला संपलेल्या तिमाहीमध्ये पूर्वांकाराने 323 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.









