नवी दिल्ली
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनीमध्ये जवळपास 51 टक्के इतका हिस्सा विकत घेतला आहे. लोटसचे 65,48,935 समभाग 74 कोटी रुपयांना रिलायन्सने विकत घेतले आहेत. यामध्ये प्रति समभाग 113.00 रुपये प्रमाणे खरेदी केले आहेत. लोटसने अतिरिक्त 26 टक्के (33,38,673 शेअर्स) वाटय़ासाठी खुली ऑफर देखील जाहीर केली आहे.
5 वर्षांत 410 टक्के परतावा
रिलायन्सच्या करारानंतर लोटस चॉकलेटच्या समभागांनी एका वर्षासाठी 10.92 टक्के इतका परतावा दिला असल्याची नोंद करण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी 30 डिसेंबर 2021 रोजी समभागाची किंमत 110.85 रुपये होती. कंपनीने 5 वर्षात 410 टक्क्यांचा इतका परतावा दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे.









