नवी दिल्ली
देशातील मोठी सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने संयुक्त अरब अमिरातमधील सिमेंट कंपनी आरएकेमध्ये 29 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी 10.11 कोटी डॉलर मोजले असल्याचे समजते. नुकतीच काही दिवसांपूर्वी अल्ट्राटेकने हिस्सेदारी खरेदीसंदर्भातली माहिती दिली आहे. सदरच्या हिस्सेदारीसाठी कंपनीने 839.52 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे समजते.
कंपनीच्या पूर्ण मालकीच्या मीडल इस्ट इन्वेस्टमेंट लिमिटेडने आरएके सिमेंट कंपनीत 29 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. सदरची आरएके कंपनी अबु धाबी आणि कुवेत शेअर बाजारात सुचीबद्ध आहे.









