कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागात बसविण्यात आलेले सिसीटीव्ही हे कोणतेही कोणतेही टेंडर न काढता कोटेशनच्या बसविले आहेत. युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी याच कंपनीस सर्व कामे मार्केट रेटच्या तिप्पट किंमतीने देवून महापालिकेची 1 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शुक्रवारी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. याबाबतचे निवेदन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले.
महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांनी महापालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र यासाठी मॉनिटरच बसविण्यात आलेले नाहीत. हे काम अपुरे असून या कामाचे थर्डपार्टी ऑडीट गर्व्हमेंट पॉलीटेक्नीकल कॉलेजने पे आहे. यामध्ये काम अपुरे असल्याचे नमुद करण्यात आले आहे. मात्र तरीही यशपाल रजपूत यांना 27 लाख रुपये अदा केले आहेत. याची तीन महिने चौकशी सुरु असून अद्याप यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. कोरोना काळात आयसोलेशनसह सर्व कोविड सेंटरवर बसविण्यात आलेले सिसीटीव्ही कॅमेरे गायब करण्यात आलेले आहेत. महापालिकेतील 289 पैकी 50 कॅमेरे सुरु आहेत. इतर विभागातील बंद आहेत. महापालिका आणि जिल्हापरिषद या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. परंतु जिल्हापरिषदेने रितसर निविदा प्रक्रिया राबवून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी केली आहे. महापालिकेने जिल्हापरिषदेच्या तिप्पट दराने कॅमेरे का खरेदी केले असा सवाल माजी महापौर भूपाल शेटे यांनी उपस्थित केला. यासह सर्व सिसीटीव्ही खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली असून, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
- खरेदीची प्रक्रिया टेंडर काढूनच
सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक आणि प्रिटर खरेदीची प्रक्रिया टेंडर काढूनच करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या कंपनीसच ठेका देण्यात आला असून, प्रशासक यांच्या मान्यतेनेच ही प्रक्रिया राबविल्याची माहिती सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांनी दिली. तसेच कोव्हिड सेंटरमधील सिसीटीव्ही महापालिकेच्या अन्य विभागांमध्ये बसविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.








