अमेरिकेत भाडय़ाने घर घेणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. तेथे घरमालक सातत्याने घरभाडे वाढवत असल्याने भाडेकरूंना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वाढीव भाडे द्या किंवा घर खाली करा अशी धमकी घरमालक देत आहेत. अशा समस्येमुळे भाडेकरूंना स्वतःचा एक ग्रूप तयार करत हाउसिंग डेव्हलपमेंट फंड को-ऑपरेटिव्हची निर्मिती करत भाडेकरूंना स्वस्त घरं उपलब्ध करविण्याचा पुढाकार घेतला आहे.
घरमालकाकडून भाडेवाढ किंवा घर खाली करण्याच्या धमक्यांनी त्रस्त लोकांना हा ग्रूप मदत करत आहे. न्यूयॉर्कमध्ये एका छोटय़ा ब्रोनॉक्स अपार्टमेंटमध्ये राहणारे अनेक भाडेकरू मागील 5 वर्षांपासून एकत्र राहत होते. परंतु घरमालकाने इमारत अन्य कुणाला तरी विकली होती. यामुळे सर्व भाडेकरूंसमोर समस्या उभी ठाकली. कारण नवा घरमालक त्यांना भाडेवाढ किंवा घर खाली करण्याची धमकी देत होता. यामुळे काही भाडेकरूंना मिळून योजना आखली. ग्रूपने एका एनजीओची मदत घेतली.

भाडेकरूंना घरखरेदीची संधी
एनजीओने नव्या घरमालकाला 20 कोटी रुपये देत ही इमारतच खरेदी केली आणि भाडेकरूंच्या ग्रूपच्या ताब्यात दिली. आता सर्व भाडेकरू केवळ 2 लाख रुपये भरून स्वतःसाठी एक अपार्टमेंट खरेदी करत आहेत. या घटनेनंतर अमेरिकेत एका नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आतापर्यंत सुमारे 7100 को-ऑप्स तयार करून अशाप्रकारच्या समस्या निकालात काढल्या जात आहेत.









