वारणानगर / प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन सोमवार दि. २९ रोजी मयुरबाग सभागृह पन्हाळा येथे सकाळी ११ वा.आयोजित करणेत आले असून तालुक्यातील महिलानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिभा शिर्के यानी केले आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा, जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी व तहसिलदार कार्यालय पन्हाळा च्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन केले असून यामध्येसमस्याग्रस्त व पिडीत महिला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलेच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा तसेच शासकीय यंत्रणेकडून महिलेच्या अडचणींची सोडवणूक तसेच समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा मिळावी यासाठी पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीरास शासनाचे सर्व विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहून विविध योजनांची माहिती देणार आहेत अशी माहिती स्त्री समाधान शिबीराच्या सचिव तथा प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यानी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









