प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला मानवी तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याआधी पटियालाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.आता त्याला परत अटक करण्यात आली आहे. दिलेरला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.या जेलमध्ये नवज्योतसिंग सिद्धू हि शिक्षा भोगत आहेत.
Previous Articleपरशुराम घाट केवळ अवजड वाहनांसाठी दिवसा खुला
Next Article हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी बंधारे पाण्याखाली









