वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आयएनबीएल प्रो 25 वर्षांखालील वयोगटाच्या बास्केटबॉल स्पर्धेत पंजाब वॉरियर्सने हैद्राबाद फाल्कन्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
पंजाब वॉरियर्स आणि हैद्राबाद फाल्कन्स यांच्यातील हा उपांत्य फेरीचा सामना अटितटीचा झाला. दरम्यान पंजाब वॉरियर्सने हैद्राबाद फाल्कन्सचा 98-72 गुणांनी पराभव केला. पंजाब वॉरियर्सतर्फे स्टोक्ले चॅपीने 15 गुण नोंदविले तर थॉमस गॅरेट आणि गुरुबाज संधू यांनी अनुक्रमे 14 आणि 16 गुण नोंदविले. सामन्याच्या पहिल्या सत्रात पंजाब वॉरियर्सने हैद्राबाद फाल्कन्सवर 12 गुणांची आघाडी मिळविली होती.









