वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2024-25 च्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामासाठी पंजाब एफसी संघाने क्रोएशीया आणि नॉर्वेच्या फुटबॉलपटूं समवेत नुकताच नवा करार केला आहे.
पंजाब एफसी संघाने क्रोएशियाचा फुटबॉलपटू इव्हान नोव्होसिलेक आणि नॉर्वेचा मुशेगा बॅकेनगा यांना करारबद्ध केले आहे. नोव्होसिलेक यापूर्वी ताजिकस्थानमधील एफसी इस्तिकोल क्लबकडून खेळत होता. नॉर्वेचा बॅकेनगा याने आपल्या वयाच्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 362 सामन्यात 109 गोल नोंदविले आहेत.









