जयपूर : दशकभराच्या वेदनांनंतर यशाच्या लाटेवर स्वार झालेला पूर्ण ताकदीचा पंजाब किंग्स आज शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना करताना 11 वर्षांत प्रथमच आघाडीच्या दोन संघांत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. 2014 च्या हंगामात पंजाब साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिले होते आणि उपविजेते बनले होते. याव्यतिरिक्त पंजाबला गेल्या 18 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या स्पर्धेत फक्त एकदाच प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला. 11 वर्षांचा दुष्काळ संपवल्यानंतर पंजाब आता केवळ पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर अंतिम सामन्यात प्रवेश करून पहिले विजेतेपद मिळविण्याकरिता धडपडत आहे.
मार्कस स्टोइनिस, जोश इंग्लिस, एरोन हार्डी आणि काइल जेमीसन हे त्यांचे परदेशी खेळाडू तीन दिवसांपूर्वी सामील झाल्याने आत्मविश्वासाने भरलेल्या संघाला आणखी बळकटी मिळाली आहे. बुधवारी मुंबई इंडियन्सविऊद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या दिल्लीला नमवून अव्वल दोन स्थानांपैकी एकावर दावा करण्याचा प्रयत्न पंजाब करणार असून त्याकामी हे चारही खेळाडू उपलब्ध असतील. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे बीसीसीआयला स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करावी लागली होती आणि त्यामुळे या दोन्ही संघांमधील धरमशाला येथील 8 मे रोजीचा सामना पहिल्या डाव झाल्यानंतर रद्द करावा लागला होता. पंजाबच्या थिंक टँकने स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांच्या परदेशी खेळाडूंना तातडीने परत आणण्यात चांगले काम केले आहे आणि आता संघात अनेक वर्षे अनुभवलेल्या निराशेची भरपाई करण्याचा दृढनिश्चय केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
तीन संघांना आयपीएल प्लेऑफमध्ये नेणारा पहिला कर्णधार बनून नुकताच इतिहास रचणारा पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर ही त्यांच्या यशाची गुऊकिल्ली आहे आणि संघाला पुढे जाण्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये या शैलीदार फलंदाजाला अशीच कामगिरी करत राहावी लागेल. गेल्या वर्षीच्या कोलकाता नाईट रायडर्ससोबतच्या विजयी मोहिमेपूर्वी अय्यरने 2019 आणि 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये नेले होते. 2020 मध्ये दिल्ली त्यांच्या आतापर्यंतच्या एकमेव आयपीएल फायनलमध्ये खेळली होती. 12 सामन्यांमध्ये 435 धावांसह श्रेयस अय्यर या हंगामात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे आणि तो आणखी धावा काढण्याची तयारी करत आहे. प्रभसिमरन सिंग (458 धावा), प्रियांश आर्य (356 धावा), अर्शदीप सिंग (11 बळी) आणि युजवेंद्र चहल (13 बळी) यासारख्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे पंजाब या हंगामात सर्वांत सातत्यपूर्ण संघ म्हणून उदयास आला आहे. त्यांनी 12 सामन्यांमध्ये 17 गुण मिळवून दोन सामने शिल्लक असताना प्लेऑफमध्ये
स्थान निश्चित केलेले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा विचार केला, तर या हंगामात त्यांना संधी मिळाल्या होत्या. परंतु पॉवरप्लेमध्ये सातत्याने भरपूर धावा करण्यात आलेले अपयश आणि शेवटच्या टप्प्यात आघाडीचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची अनुपस्थिती यामुळे त्यांच्या संधींवर विपरित परिणाम झाला आहे. ते त्यांच्या निराशाजनक मोहिमेचा शेवट चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील, परंतु पंजाबसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध, ते साध्य करणे सोपे जाणार नाही.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, प्रियांश आर्य, पायला अविनाश, अजमतुल्ला ओमरझाई, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, प्रवीण दुबे, एरोन हार्डी, हरनूर सिंग, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, काइल जेमिसन, मार्को जॅनसेन, मुशीर खान, मिचेल ओवेन, प्रभसिमरन सिंग, कुलदीप सेन, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, नेहल वढेरा, यश ठाकूर.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), मुस्तफिजुर रहमान, अभिषेक पोरेल, कऊण नायर, के. एल. राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नळकांडे, त्रिपुराना विजय, दुष्मंथा चमीरा, फाफ डू प्लेसिस, टी. नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंत कुमार एल., माधव तिवारी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.









