वृत्तसंस्था / चेन्नई
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या 14 व्या अखिल भारतीय वरिष्ट पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेत शनिवारी पाचव्या दिवशी पंजाब, राजस्थान, ओदिशा, बंगाल आणि मिझोराम या संघांनी शानदार विजय नोंदविले.
येथील मेयर राधाकृष्णन् हॉकी स्टेडियमवर खेळविण्यात अ गटातील पहिल्या सामन्यात पंजाबने छत्तीसगडचा 10-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. ई गटातील अन्य एका सामन्यात राजस्थानने अरुणाचलप्रदेशवर 4-3 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळविला. ई गटातील अन्य एका सामन्यात ओदिशाने पुडुचेरीचा 6-2 असा फडशा पाडला. ब गटातील सामन्यात मिजोरामने हिमाचल प्रदेशचे आव्हान 6-3 असे संपुष्टात आणले. महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. बंगालने बिहारचा 12-2 असा दणदणीत पराभव केला.









