चंदीगढ
पंजाबमध्ये पोलिसांनी टार्गेट किलिंगचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. मोहाली पोलिसांच्या पथकाने टार्गेट किलर गुरिंदर सिंग उर्फ गुरी याला खरर येथून अटक केली. अटक केलेल्या गुरीकडून तीन पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक चौकशीत तो शहरातील एका अतिमहनीय व्यक्तीला ठार करण्याच्या बेतात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला या संदर्भात युरोपीयन हँडलरकडून सूचना देण्यात आल्या होत्या.
अटक करण्यात आलेला गुरिंदर सिंग उर्फ गुरी शेरा हा फतेहगढ साहिबमधील सिधवान गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणी, शस्त्रास्त्र कायदा, स्नॅचिंग आणि दरोडय़ाचे विविध गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशमधून शस्त्रास्त्र तस्करी केल्याच्या गुन्हय़ातही तो मुख्य संशयित आहे.









