क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
बास्केटबॉल 5×5 स्पर्धेची जेतेपदे केरळ व पंजाबने मिळविली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील या स्पर्धेतील अंतिम लढती काल नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात आल्या.
पुरूष विभागातील अंतिम लढतीत पंजाबने तामिळनाडूचा 105-103 असा पराभव केला. पंजाबसाठी भारताचा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू अमज्योत सिंगने 42 तर तामिळनाडूसाठी बी. सुर्याने 28 गुण प्राप्त केले. तामिळनाडूला पुरूष विभागात रौप्य पदक मिळाले. ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत दिल्लीने सेनादलचा 93-56 असा पराभव केला.
महिला विभागात जेतेपद मिळविताना केरळने कडव्या लढतीनंतर कर्नाटकचा 57-54 गुणानी पराभव केला. केरळसाठी आर. श्रीकलाने 29 तर कर्नाटकच्या संजना रमेशने 21 गुणांची कमाई केली. तामिळनाडूने उत्तरप्रदेशला नमवून महिला विभागात ब्राँझपदक मिळविले.









