वृत्तसंस्था/ चेन्नई
करून हॉकी इंडिया पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीत त्यांची लढत कर्नाटकशी तर दुसरी उपांत्य लढत हरियाणा व तामिळनाडू यांच्यात होईल.
उत्तराखंडविरुद्ध झालेल्या आधीच्या सामन्यात हरमनप्रीतने हॅट्ट्रिक नोंदवली होती. येथील सामन्यात त्याने 31 व 51 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर्सवर दोन गोल नोंदवले. याशिवाय सुखजीत सिंग (20 वे मिनिट), परदीप सिंग (6 वे मिनिट) यांनी उर्वरित दोन गोल केले. मणिपूरतर्फे कर्णधार चिंगलेनसाना सिंग (36 वे मिनिट), रिषी युमनाम (45 वे मिनिट) यांनी एकेक गोल केले.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकने झारखंडवर 4-1 असा विजय मिळविला. विजयी संघाचे गोल हरीष मुटागर (46 व 49 वे मिनिट), कर्णधार शेषे गौडा (23 वे मिनिट), लिखित बी (32 वे मिनिट) यांनी नोंदवले. झारखंडतर्फे दिलबर बार्लाने (39 वे मिनिट) एकमेव गोल नोंदवला. अन्य एका सामन्यात तामिळनाडूने उत्तर प्रदेशवर 3-2 असा रोमांचक विजय मिळविला. तामिळनाडू संघ पूर्वार्धात पिछाडीवर पडला होता. पण उत्तरार्धात जे केव्हिन किशोर (33), कर्णधार जे. जोशुआ बेनेडिक्ट वेसली (52 व 59 वे मिनिट) यांनी गोल नोंदवून विजय साकार केला. पूर्वार्धात उत्तर प्रदेशचे गोल मनीष सहानी (27) व सुनील यादव (30 वे मिनिट) यांनी गोल नोंदवत आघाडी मिळविली होती. हरियाणाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ओडिशावर 3-2 असा पराभव करून आगेकूच केली. निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाली होती.









