प्रत्येक कैद्याचे होणार ड्रग स्क्रीनिंग
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबच्या तुरुंग प्रशासनाने नवा पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व तुरुंगांमधील कैद्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या तपासणीद्वारे हे कैदी तुरुंगांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करत आहेत का हे पाहिले जाणार आहे. कैद्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आल्यास संबंधित कैदी तसेच तुरुंगात अमली पदार्थ पुरविणाऱयाच्या विरोधात गुन्हा नोंद होणार आहे.
रोपड तुरुंगातून या तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. या तपासणीचा निष्कर्ष समोर आल्यावर पंजाबमधील सर्व तुरुंगामध्ये अशाच प्रकारे वैद्यकीय तपासणी होणार आहे. पंजाबच्या तुरुंगांमध्ये कैद 40 टक्के गुन्हेगार आणि आरोपी अमली पदार्थांचे सेवन करणारे होते. तुरुंगात कुठल्या प्रकारचे अमली पदार्थ अपलब्ध होतात याचा उलगडा या तपासणीमुळे होणार आहे.









