वृत्तसंस्था / अहमदाबाद
2024 च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गटातील येथे शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाबने बलाढ्या मुंबईचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात 38 धावांत 5 गडी बाद करणाऱ्या अर्शदीप सिंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
पंजाबने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईचा डाव 48.5 षटकात 248 धावांत आटोपला. त्यानंतर पंजाबने 29 षटकात 2 बाद 249 धावा जमवित विजय नोंदविला.
मुंबईच्या डावात अथर्व अंकोलेकरने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 66, शेडगेने 43 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 44, शार्दुल ठाकुरने 45 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43, कर्णधार श्रेयेस अय्यरने 17, शिव दुबेने 17 तर डायसने नाबाद 18 धावा जमविल्या. पंजाबतर्फे अर्शदीप सिंगने 38 धावांत 5 तर अभिषेक शर्माने 47 धावांत 2 तसेच दत्ता, रघु शर्मा आणि सनवीर सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
पंजाबच्या डावामध्ये सलामीच्या प्रभसिमरन सिंगने 101 चेंडूत 10 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 150, कर्णधार अभ्घ्षेक शर्माने 54 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 66, रमनदीप सिंगने 12 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 22 धावा जमविल्या. प्रभसिमरन सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीच्या गड्यासाठी 150 धावांची भागिदारी केली. मुंबईतर्फे शार्दुल ठाकुर आणि म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावलफक: मुंबई 48.5 षटकात सर्वबाद 248 (अंकोलेकर 66, शेडगे 44, ठाकुर 43, अर्शदीप सिंग 5-38, अभिषेक शर्मा 2-47), पंजाब 29 षटकात 2 बाद 249 (प्रभसिमरन सिंग नाबाद 150, अभिषेक शर्मा 66, रमनदीप सिंग 22, म्हात्रे आणि ठाकुर प्रत्येकी 1 बळी)









