वृत्तसंस्था / चेन्नई
15 व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी पंजाब आणि झारखंड यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवित अंतिम फेरी गाठली.
दिवसाच्या पहिल्याअपांत्य फेरीत पंजाबने उत्तर प्रदेशचा 4-3 असा पराभव केला. मनदीप सिंग (19 व्या मिनिटला) आणि वरिंदर सिंग (28 व्या मिनिटला) यांनी पहिल्या सत्रात गोल केल्यानंतर सुगादेव सिंग (51 व्या आणि 52 व्या मिनिटला) यांनी उशीरा दोन गोल केले. उत्तरप्रदेशकडून हर्ष प्रताप सिंग (9 व्या मिनिटला), अली शाहरुख (21 व्या मिनिटला) आणि कर्णधार केतन कुशवाह (28 व्या मिनिटला) यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य फेरीत झारखंडने मध्य प्रदेशच्या 3-1 असा पराभव केला. लव्ह (21 व्या मिनिटला) यांनी मध्यप्रदेशला आघाडी मिळवून दिली असली तरी झारखंडने सोरेंग सुमरे (29 व्या मिनिटला), अशिष तानी पूर्ती (44 व्या मिनिटला) आणि जयसन कंदुलना (56 व्या मिनिटला) यांच्या गोलने पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी तिसऱ्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यात उपांत्य फेरीतील पराभूत उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश एकमेकांसमोर येतील.









