पुणे / प्रतिनिधी :
पंजाबमध्ये फरार अमृत पाल हा कोण आहे? त्याच्या पाठीमागे किती समाज आहे? त्याने पंजाबसाठी काय केले आहे? सोशल मीडियामध्ये केवळ त्याला नाहक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आम आदमी पक्ष सरकार अपयशी ठरले असून, ते त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी सीख समाजाचा वापर करत आहे. आम आदमी पक्षाचे अपयश पंजाबने पाहिले आहे. गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, अशी टीका राष्ट्रीय अल्पसंख्याक बोर्डाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी व्यक्त केले.
मुस्लिम आणि ज्यू समाजाचा एकत्रित प्रथमच रोझा इफ्तार कार्यक्रम आणि भाजपमध्ये विविध अल्पसंख्यांक समाजाच्या पक्षप्रवेश प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अली दारूवाला यांची राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.
लालपुरा म्हणाले, भारत केवळ एकमेव देश आहे, ज्याठिकाणी अल्पसंख्याक समाज प्रगती करत आहे. पूर्वी अल्पसंख्याक समाजाची देशातील संख्या 16 टक्के संख्या होती, ती आता 21 टक्के झाली आहे. कोणतेही क्षेत्र नाही, ज्याठिकाणी अल्पसंख्याक समाजाचा समावेश नाही. देशभर दौरा करून आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन चर्चा करत असतो. प्रधानमंत्री यांच्या विचारधारेनुसार सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येत आहे. राजकारण नाही, सामाजिक काम करायचे, हे पंतप्रधानांचे धोरण आम्ही पुढे नेत आहोत.
जगात भेदभाव पाहिल्यास 13 टक्के केसेस यूएस मध्ये वाढले. पण पंजाब, भरतात नाही. एखादं दोन घटना घडल्यास स्वतः दखल घेऊन न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले.








